
नागपूर(Nagpur): राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व्दारे आयोजीत आंतर महाविद्यालयीन कॉर्फबॉल स्पर्धेचे आयोजन श्री नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालय सिव्हिल लाईन्स नागपूर येथील कीडा संकुलात दि. 27/03/2026 ते 28/03/2026 पर्यंत आयोजीत करण्यात आले होते. या स्पर्धेत धनवटे नॅशनल कॉलेज संघ विजेता ठरला. अंतीम सामन्यात शंकरलाल अग्रवाल महाविद्यालय, सालेकसा या संघाचा 3-2 ने पराभव केला. तिसरे स्थान जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा ने प्राप्त केले.
पुरस्कार वितरण समारंभाला तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेश धुर्वे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. तसेच श्री नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक अवसरे, डॉ. देवेंद्र वानखेडे, डॉ. संजय बीरणवार, मोहनीश जबलपुरे, प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. अविनाश शहारे, प्रा. प्रमोद नेटी, डॉ. वर्षा बारोकर, डॉ. शिल्पा कुकडे, डॉ. अनिल वाळके, राजेश वाकले, नरेश माहुर्ले, संध्या खोडे, वैभव सोनटक्के, मेंहंदी हसन, सुदर्षन बांबुर्डे इ. अथम परीश्रम घेतले.
















