विदर्भ साहित्य संघाचे माजी ग्रंथ संचालक व ज्येष्ठ नाट्यरंगकर्मी, कवी दिलीप त्रंबकराव म्हैसाळकर यांचे निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष स्व. मनोहर म्हैसाळकर यांचे ते बंधू होते.
माटे चौकात सायकल चालवताना खाली कोसळून त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ते अविवाहित होते व अभ्यंकर नगरातील वृद्धाश्रमात राहत होते. ते मागील काही दिवसांपासून अस्थमा व हृदयरोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी किशोर भांदगकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या श्रद्धांजली सभेत अॅड. रोहित देव, आशुतोष शेवाळकर, नचिकेत म्हैसाळकर, सुनील किटकरु, सलीम शेख, बापू चनाखेकर, सचिन गिरी इत्यादींनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
विदर्भ साहित्य संघातर्फे शोकसंवेदना
दिलीप म्हैसाळकर यांनी विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवास या ग्रंथालयाचे अनेक वर्ष संचालन केले होते. ग्रंथांचा सहवास लाभलेल्या दिलीप म्हैसाळकर यांनी ग्रंथसहवासमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबवून वाचकांना ग्रंथालयाकडे आकर्षित केले होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, ग्रंथसहवासचे ग्रंथ संचालक विवेक अलोणी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.