Dress code भाविकांसाठी ड्रेसकोड, सप्तश्रुंगी देवस्थानाकडून अद्याप निर्णय नाही

0

नाशिक: nashik  राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. मात्र, साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या वणी येथील सप्तश्रुंगी देवी (Saptashrungi Devasthan) देवस्थानने सावध भूमिका घेतली आहे. राज्यातील इतर सर्व शासकीय देवस्थानात वस्त्रसंहिता (Dress code in Temples) लागू करण्याबाबत जो काही निर्णय होईल, त्याचा विचार करूनच योग्य तो सर्वसमावेशक निर्णय घेतला जाणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

 

राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भक्तांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याची सुरुवात नागपुरातून झाली आहे. मंदिर व्यवस्थापन संघटनेच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला होता. आता नाशिकच्या सप्तश्रुंगी मंदिरातही यासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गुरुवारी सप्तश्रुंगी गड मंदिर संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी व्ही वाघ यांच्या उपस्थितीत मंदिराच्या विश्वस्तांची बैठक नाशिक शहरातील द्वारका परिसरात असलेल्या संस्थानच्या कार्यालयात पार पडली. वस्त्रसंहिता लागू करण्याबाबत सप्तश्रुंगीगड ग्रामपंचायतीने गेल्या महिन्यात मासिक बैठकीत केलेल्या ठरावावरही या बैठकीत चर्चा झाली. दर्शनासाठी येताना महिलांसोबतच पुरुषांनी पूर्ण पेहराव परिधान करावा, असे या ठरावात नमूद करण्यात आले होते. आता संस्थानही त्यावर विचार करण्याच्या तयारीत आहे. आगामी काळात योग्य तो विचार करून सर्वसमावेशक निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.