sharad pawar मंत्रिपद जाण्याची चर्चा असलेल्या गुलाबरावांचा पवारांसोबत रेल्वेप्रवास

0

मुंबई mumbai – शिंदे गटातील पाच मंत्र्यांचे मंत्रिपद जाण्याची चर्चा मागील पंधरा दिवसांपासून सुरु आहे. या पाच मंत्र्यांमध्ये राज्याचे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री gulabrao patil गुलाबराव पाटील यांचा समावेश असल्याचे बोलले जाते. मात्र, आता या चर्चेनंतर मंत्री गुलाबराव पाटील व पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील या शिदे गटातील दोन नेत्यांनी शरद पवारांसोबत मुंबई ते जळगाव प्रवास केल्याचे फोटो आले आहेत. (Shinde Camp Minister meet Sharad Pawar) या नेत्यांकडून दबावतंत्र सुरु असल्याची चर्चा असून गुलाबराव पाटील यांनी पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा केलाय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अंमळनेर येथे शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुंबई येथून राजधानी एक्सप्रेसने गुरुवारी जळगावला आले. त्यांच्यासोबत शिंदे गटातील या दोन्ही नेत्यांनी मुंबईहून जळगावपर्यंत एकाच डब्यात पवारांसोबत प्रवास केला. त्यात त्यांच्यात राज्यातील राजकीय घटनाक्रमासह विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाल्याचे समजते. जळगाव स्थानकावर पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना गाठले असता ते म्हणाले की, शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. इतर विषयावर चर्चा झाली. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला चांगलेच ठरणार आहे. मंत्रीपदावर टांगती तलवार असताना गुलाबरावांनी शरद पवारांची भेट घेतल्यानेही यासंबंधी वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरु आहेत.