जळगाव : जे विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांना छळण्यासाठी, विरोधकांवर दबाव आणण्यासाठीच जाणीवपूर्वक ईडी सारख्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी मार्फत तब्बल नऊ तास चौकशी झाली. यावरून एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे, त्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मात्र तरीही विरोधकांवर दबाव आणण्यासाठी जाणीवपूर्वक ईडीच्या सरकारी यंत्रणेचा वापर केला जात आहे अस एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामधील वाद उफाळून आल्याची चर्चा आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, असा कुठलाही वाद आमच्यात नाही.