
बुलढाणा- उन्हाळा संपत आल्याने खरिपाची चाहूल लागली आहे. शेतकरी शेती मशागतीसाठी तयारी करीत आहेत. शेतकरी खते बी बियाणे यासाठी शासकीय बँक पतसंस्था यांच्या चकरा मारत असतो, त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात एक लाख 53 हजार शेतकऱ्यांना 1470 कोटी रुपयाचे उद्दिष्ट मिळाले असून आतापर्यंत 30 हजार 109 शेतकऱ्यांना 318 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षात किंवा मागील वर्षात कर्ज घेतली असेल आणि त्यांनी नूतनीकरण जर केले तर अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून चार टक्के आणि केंद्र शासनाकडून तीन टक्के व्याज 100% माफ होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा दर हा शून्य टक्के लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















