नागपूर मेट्रो भ्रष्टाचार ब्रिजेश दीक्षित अन् ऑडिटर संस्था जबाबदार! प्रशांत पवार यांचा आरोप

0

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात ८७७ कोटींचे टेंडर संस्थेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी टेंडर न काढता आपल्या जवळच्या लोकांना देऊन टाकल्याचा आरोप नागपुरातल्या जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे.
सोमवारी शंखनादशी बोलताना प्रशांत पवार यांनी कॅगच्या अहवालाचा हवाला देत नागपूर मेट्रो रेल्वेच्या कारभारातील गलथानपणा आणि पैशाची उधळण उजागर केली.
ज्याची गरजच नव्हती असे मिहान इको -पार्क, कस्तुरचंद पार्क मेट्रो रेल्वे स्टेशनच्या पार्किंग व्यवस्थेवर पंचवीस कोटींची उधळण, पूर्व नियोजनात समाविष्ट नसलेल्या दोन स्थानकांचा अंतर्भाव…असे विविध दाखले देत प्रशांत पवार यांनी हा भ्रष्ट कारभार ज्यांच्या नजरेखाली झाला ते ब्रिजेश दीक्षित आणि मेट्रोची ऑडिटर यंत्रणा या दोघांनाही जेलमध्ये टाकण्याची मागणी केली