“..निकालही आमच्या बाजुने लागेल”, मुख्यमंत्र्यांना विश्वास

0

 

मुंबई- “त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच आमच्यावर मॅच फिक्सींगचे ते आरोप करीत आहेत. निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह आम्हाला दिले आहे. त्यामुळे निकालही आमच्या बाजुने लागेल, असा आम्हाला विश्वास आहे”, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  EKNATH SHINDE  यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आपला विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  Rahul Narvekar यांचा अधिकृत निर्णय आल्यानंतर प्रतिक्रिया देईल व आमची भूमिका स्पष्ट करेन. पण, आम्हाला निकालावर विश्वास आहे. शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत मान्यता दिली. धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने आम्हाला दिले आहे. बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि चिन्ह दिले आहे. विधानसभेमध्ये ६७ टक्के बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये ७५ टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळेच निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली.

आता काही लोक मॅच फिक्सिंगचा आरोप करतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी काल मंगळवारी झालेल्या भेटीवरही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. नार्वेकर भरदिवसा भेटायला आले होते, रात्री भेटले नाहीत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. अध्यक्षांच्या मतदारसंघांमध्ये जे काम सुरू आहे, त्या कोस्टल रोड, मरीन ड्राईव्हच्या कामाची मी स्वतः पाहणी केली होती. ते आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील विषय होते. अधिकाऱ्यांसह अधिकृत बैठक झाली. लपून-छपून बैठक झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.