सुनील केदार मध्यवर्ती कारागृहाबाहेर,जल्लोषात स्वागत

0

नागपूर NAGPUR – काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार  SUNIL KEDAR उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आज दुपारी मध्यवर्ती कारागृह बाहेर आले.यावेळी त्यांचे केदार समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले.

एका खुल्या जीप वर उभे राहून स्वतः सुनील केदार यांनी देखील आपल्या समर्थकांचे विजयाचे चिन्ह दाखवत अभिवादन स्वीकारले.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 153 कोटींच्या रोखे घोटाळ्यात 5 वर्षे शिक्षा सूनावल्यानंतर मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. या निर्णयानंतर आज केदार कारागृहातून बाहेर आले.