कशी असणार भविष्यात शेती ?

0

नागपूर NAGPUR  -एलिव्हेटेड फार्मिंग Elevated Farming  हा अफलातून प्रयोग या ठिकाणी जैन इरिगेशनने शेतकऱ्यांपर्यंत प्रथमच पोहचविला आहे. कसा आहे हा प्रयोग ? आज गावात शेती विकली जात असल्याने भविष्यात शेतजमीन राहणार नाही. किमान जमीन आणि किमान पाण्यामध्ये शेती कशी करावी, यासंबंधीचे एलिव्हेटेड फार्मिंगचे उत्तम प्रात्यक्षिक जैन इरिगेशनच्या Jain Irrigation  या प्रकल्पाच्या ठिकाणी पाहायला मिळते.

एकावर एक मजले चढवावेत अशा पद्धतीने परंपरागत पिके, फलोत्पादन,फुलझाडे अशी सर्वच प्रजातींची वाढ सुरक्षित वातावरणात केली जाते आणि विशेष म्हणजे हे सर्व प्रकल्प स्वयंचलित पद्धतीने चालते.खते, पाणी सर्व याच पद्धतीने झाडांपर्यंत पोहोचतात. भविष्यातील हवामान बदल आणि शेतजमिनी कमी होत असताना या प्रकारची अत्याधुनिक शेती हाच उत्तम पर्याय राहणार असल्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ संशोधक डॉ बाळकृष्ण यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.