शंभर टक्के निर्णय आमच्या बाजूनेचं !

0

 खा कृपाल तुमाने यांचा दावा

नागपूर  NAGPUR – आज अध्यक्षांचा शंभर टक्के निर्णय आमच्या बाजूनेच लागेल हे आम्हाला माहीत आहे.आम्ही जो उठाव केला, तो आम्ही सर्व कायदेशीर बाजू तपासूनचं केला असा दावा आज शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने KRUPAL TUMANE  यांनी माध्यमांशी बोलताना केला.

मुख्यमंत्री आणि अध्यक्षांच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार Uddhav Thackeray and Sharad Pawar  यांनी टीका केली यासंदर्भात छेडले असता जे शब्दप्रयोग आहेत, ते नेहमीच खूप खालच्या दर्जाचे राहतात. एका सभापतीला आमदार म्हणून आपल्या मतदारसंघाचे काम असते, त्या संदर्भात ते भेटले असतील पण केस संदर्भात कोणतंही बोलण झालेल नाही. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि तेच राहतील. मुख्यमंत्री परदेशात जात असून
प्रधानमंत्री महाराष्ट्रात येत आहेत याबाबत विचारले असता पंतप्रधानांचा दौरा पाहिलेपासूनच आखलेला असतो. एखाद्या राज्यात गव्हर्नर राज्य असले तरी देखील ते जातात.