
अमरावती AMRAWATI – ईव्हीएम EVM विरोधात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले. यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणाही करण्यात आल्या.
ईव्हीएम ऐवजी निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर करावा आणि लोकशाही वाचवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनानंतर 16 जानेवारी रोजी ईव्हीएम विरोधात जनजागृतीपर रॅली काढण्यात येणार असून 31 जानेवारीला दिल्ली येथील मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयावर संपूर्ण भारतातून पाच ते सहा लाख लोकांचा मोर्चा काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया यावेळी डॉ. पंचशीला मोहोड, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष यांनी दिली.
मोहेगावातील नागरिकांचे कशासाठी आमरण उपोषण ?
बुलढाणा BULDHANA – बुलढाण्यातील मोहेगाव येथे सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्या तत्काळ बंद करण्यात याव्या, अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी गोरसेनेच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरु झाले आहे. मोताळा तालुक्यातील मोहेगाव 1 हजार 900 लोकसंख्या असलेले गाव आहे. मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गावातील त्रस्त युवकांनी गावात उपोषण आंदोलन सुरू केले आहे.