हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक

0

 

अमरावती  AMRAWATI  – देशात लागू करण्यात आलेल्या नवीन हिट अँड रन Hit and run  कायद्याच्या विरोधात पुन्हा एकदा अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज सकाळपासून वाहन चालकांनी अमरावती शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. याशिवाय राजकमल चौक, बस स्थानक परिसरात वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ स्टेअरिंग छोडो आंदोलन

वर्धा- हिट अँड रन कायदा रद्द झाला पाहिजे, यासाठी चालक, मालकांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे. शेकडो वाहन चालक या संपात सहभागी झाले असून पवनार येथील मामा -भाचे समाधीजवळ रस्ता रोको आंदोलन बुधवारी करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. वाहन चालकांनी यावेळी ट्रक ड्रायव्हरला स्टेअरिंग बंद आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सांगितले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.