वणीत ओबीसींचा एल्गार मोर्चा, जातनिहाय जनगणनेची मागणी

0

 

यवतमाळ – ओबीसींची जातनिहाय जनगणना करून त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात ओबीसी समाज बांधवांकडून एल्गार मोर्चा काढण्यात आला. ओबीसी समाजाची संख्या 52 टक्के असताना त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही. राज्यकर्त्यांनी आतापर्यंत ओबीसी समाजावर अन्याय केला आहे.

मराठा समाजाला ओबीसीत समावेश करून ओबीसींवर अन्यायच करण्यात आला. कुत्रे, मांजर, वाघ, सिंह यांची जनगणना करण्यात येते. परंतु, ओबीसींची नाही. आता जनगणना केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा रमेश येरणे, ओबीसी नेते, प्रविण खानझोडे, ओबीसी समन्वयक नेते ,रुद्र कुचनकर या ओबीसी नेत्यांनी दिला आहे.

भगरीच्या पिठाचे झटपट होणारे तोंडुळे | Shankhnaad News #shankhnaadnews #live