अमरावती सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती संचालक मंडळ निवडणूक

0

 

अमरावती – अमरावती सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती संचालक मंडळ निवडणूक 2024-29 आज रविवारी एकूण सहा केंद्रावर पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया झाली. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी 16 जागा या बिनविरोध आल्या आहेत. सेवा सहकारी संस्थेमधून आठ जण बिनविरोध झाले. वैयक्तिक मतदारसंघातून चार उमेदवार बिनविरोध झाले तर महिला राखीव मतदार संघातून दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून प्रत्येकी एक उमेदवार हा बिनविरोध झाला आहे.

आज झालेली प्रत्यक्ष निवडणुक इतर मागासवर्ग मतदार संघाकरिता पार पडतेय. त्यामध्ये दोन उमेदवार रिंगणात आहेत.एकूण 1945 मतदार या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. एकूण सहा केंद्रावर याकरिता मतदान होत असून त्यापैकी अमरावतीमध्ये चार केंद्रावर मतदान होत आहे. तर शिराळा येथे दोन मतदान केंद्रावर मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी अच्युत उल्हे यांनी दिली.

भगरीच्या पिठाचे झटपट होणारे तोंडुळे | Shankhnaad News #shankhnaadnews #live