
बुलढाणा- बुलढाण्यातील अजिंठा राष्ट्रीय महामार्गावर कारचा विचित्र अपघात झाला आहे. बुलढाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी गावाजवळ असलेल्या विद्युत उपकेंद्रालगत एका नाल्यावरील पुलावर भरधाव वेगात असलेली कार धडकल्याने कारचे 2 तुकडे झाले आहे. या अपघातात 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज मढकडून कार बुलढाण्याच्या दिशेने येत होती. याचवेळी पाडळी विद्युत उपकेंद्राजवळ भरधाव वेगात ही कार पुलावरील सुरक्षा कठड्यावर जाऊन धडकली आहे. यात कारचे 2 तुकडे झाले तर कार मधील दोन जण जखमी असल्याची माहिती समोर आली असून त्यांची नावे अद्याप समजू शकली नाही.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















