अमरावती- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या बुधवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा होणार असून बच्चू कडू हे सत्तेत सहभागी असूनही ते मोर्चा काढत असल्याने कडू यांची सरकारविषयी उघड नाराजी दिसून आली आहे. दरम्यान,उद्याच्या मोर्चाच्या पूर्वसंध्येला मोर्चाचे बॅनर अमरावती शहरात लागले आहे. या बॅनरची जोरदार चर्चा शहरात रंगू लागली आहे. “नाही पर्वा सत्तेची, कारण चिंता आहे शेतकऱ्यांची” बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात, “झुकेगा नही साला” अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.