
रात्रीच्यावेळी उड्डाणपुलावर असतो काळाभोर अंधार,
मौदा (Mauda) :- तालुक्यातील खात येथील नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलावर पथ दिवे लावण्याची मागणी वाढत आहे. अनेकदा या पुलांवर अंधार असल्याने अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पथ दिवे लावणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहे.
या मार्गावरची वाढती वाहतुक व प्रवासाला लागणारा वेळ कमी करण्यासाठी शासनाने उड्डाणपूल बांधकामासाठी करोडो रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. त्याचे काम सुद्धा आटोपले असून मागील वर्षभरापासून उड्डाणपुलावरून वाहतूक सुद्धा सुरू करण्यात आली आहे. उड्डाण पुलावरील पथदिवे लावले नसल्याने रात्रीच्या वेळी मोठा अंधार पसरला असतो यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.समोरून येणाऱ्या वाहनाचे रात्रीच्या वेळी प्रकाश एकदम डोळ्यावर पडत असल्याने वाहन चालक घाबरून जातात यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
खात येथील उड्डाणपुल रेल्वे क्रॉसिंग वर बांधलेले असुन सदर उड्डाणपुलाच्या मध्य भागी बस थांबा असून रात्रीच्या वेळेला संपुर्ण उड्डाणपुल परिसरामध्ये काळाभोर अंधार असतो. रात्रीला प्रवाशांना व इतर नागरिकांना उडान पुलाच्या मध्यभागी थांबणे म्हणजे जणूकाही तारेवरची कसरतच करावी लागते. उड्डाणपुलावर पथदिवे लावन्यात यावे अशी मागणी प्रवासासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.
प्रतिक्रिया……
उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊन कित्येक दिवस लोटून गेले, उड्डाणपुलावरची वाहतूक सुद्धा सुरु करण्यात आली परंतु उड्डाणपूलाला रंगरांगोटी व पथदिवे लागणार कधी? रात्रीच्या वेळी संपूर्ण उडानपूल परिसरामध्ये सर्वत्र अंधार पसरलेला असतो रात्रीच्या वेळी नागरिकांना याचा फार मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. सदर उड्डाणपुलाला रंगरांगोटी व पथदिवे लावण्यात यावे.
नरेश तलमले
सामाजिक कार्यकर्ता खात
तुषार कुंजेकर
तालुका प्रतिनीधी मौदा