
प्रमुख वक्ते सुधांशुजी त्रिवेदी मार्गदर्शन करणार!
नागपूर (Nagpur) :-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी येत्या शुक्रवार, ६ जून रोजी शिवाजी नगर उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक दिन सोहळा ‘हिंदू साम्राज्य दिन उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणाऱ्या या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रख्यात विचारवंत आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशुजी त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांचे प्रेरणादायी व्याख्यान. डॉ सुधांशु त्रिवेदी आपल्या ओजस्वी वाणीने छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि हिंदू साम्राज्याच्या स्थापनेमागील विचारधारेवर प्रकाश टाकतील.
या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक, इतिहासप्रेमी आणि तरुण-तरुणींनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनातून स्फूर्ती घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.