(Kolkata)कोलकाता : (Former Chief Minister of West Bengal Buddhadev Bhattacharya)पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची कन्या सुचेतना भट्टाचार्य यांनी लिंग बदलाचे ऑपरेशन करून घेणार आहेत. ऑपरेशननंतर त्यांची ओळख सुचेतन अशी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचेतना या काही दिवसांपूर्वी एका एलजीबीटीक्यू कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. तेथे त्यांनी स्वतःची ओळख पुरुष म्हणून करून दिली होती. त्यांच्या निकवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार हीच ओळख त्यांना आता शारीरिकदृष्ट्याही करायची आहे. त्यासाठीच त्यांनी लिंग बदलाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रक्रिया आणि प्रमाणपत्रांसाठी त्यांनी कायदेशीर सल्ला घेतला असून याबाबत मानसोपचार तज्ज्ञांशीही त्यांनी संपर्क साधला आहे.
या संदर्भात एका माध्यम समूहाशी बोलताना सुचेतना यांनी सांगितले की
“एलजिबिटीक्यू चळवळीचा एक भाग म्हणून मी ही शस्त्रक्रिया करणार आहे. मी स्वतःला मानसिकदृष्ट्या पुरुष समजते. त्यामुळे शरीरानेही मला आता पुरुष व्हायचे आहे.
ट्रान्स मॅन म्हणून होणारा सामाजिक छळ मला थांबवायचा आहे”, असेही त्या म्हणाल्या.
“माझ्या आयुष्याशी संदर्भातील निर्णय मी घेऊ शकते. त्यामुळे कृपया माझ्या पालकांना यात ओढू नका”, असे आवाहन त्यांनी आहे. या निर्णयाला आपले वडील पाठिंबा देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
हा माझा एकटीचा निर्णय असून हा संघर्ष मला एकट्याने लढायचा असल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणापासूनच आपल्याला पुरूष व्हायचे होते, असेही त्या सांगतात.