SUPRIYA SULE सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..”

0

 

(Pune)पुणे:अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवताना संघटनेतील पदाची इच्छा बोलून दाखवली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खासदार (Supriya Sule)सुप्रिया सुळे (NCP Working President) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे. मला मनापासून आनंद हे की, दादाला संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचे की नाही, हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हेच बहीण म्हणून मला वाटते”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता अजित पवारांना कोणती नवी जबाबदारी मिळणार,याकडे लक्ष लागले आहे.