भविष्यातील दिग्गज खेळाडू पुढे येतील : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

0

 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विजेत्यांना पुरस्कार प्रदान

नागपूर, 21 जनवरी : आदिवासी तरुणांमध्ये निसर्गतः उपजत शक्ती असते, त्यांना केवळ योग्य व्यासपीठ मिळण्याची आवश्यकता आहे. एकल अभियानाद्वारे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून भविष्यातील दिग्गज खेळाडू पुढे येतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

एकल अभियान अभ्युदय युथ क्लब द्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौक परिसरातील क्रीडांगणात आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पुरस्कार समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
मंचावर एकल अभियान चे केंद्रीय अभियान प्रमुख श्री लल्लनकुमार शर्मा, वनवासी बंधु परिषद चे अध्यक्ष नंदकिशोर सारडा, माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी उपस्थित होते.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी एकल अभियानाचे कौतुक केले. विदर्भातील अनेक मागास भागात एकल विद्यालय सुरु असून त्यात विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण दिले जाते. खेळासोबतच सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्वाचे आहे. खेळामुळे शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य देखील विकसित होते. खेळामुळे व्यक्तिव विकास महत्वाचे असल्याचे सांगत ना. गडकरी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

एकल अभियानाने दुर्गम भागात शिक्षणाची क्रांती आणली : मा देवेंद्र फडणवीस

एकल अभियान अंतर्गत मागील अनेक वर्षापासून देशभरात दुर्गम आदिवासी भागातील मुलांना शिक्षण देण्यात येत आहे. शिक्षणासोबतच मुलांना संस्कार, आणि आरोग्य शिक्षण देखील देण्यात येत आहे. यामुळे एकल अभियानाने देशातील दुर्गम भागात शिक्षणाची क्रांती घडवून आणली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन श्री प्रमोद अग्निहोत्री यांनी केले.