
नागपूर NAGPUR – 26 जानेवारीपासून शांततेत सूरू असलेले गोंड गोवारी GOND GOWARI समाजाच्या तीन तरुणांचे उपोषण आंदोलन आता आक्रमक झाले आहे. जिल्हा प्रशासनाशी रात्री झालेल्या चर्चेनुसार येत्या 10 फेब्रुवारी रोजी यासंदर्भात बैठक होणार असली तरी 1985 च्या जीआरची दुरुस्ती, आमच्या मागण्यांबाबत शासन अध्यादेश निघत नाही तोवर हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे मंगळवारी आंदोलकांनी स्पष्ट केले.सोमवारी दुपारपासून हजारो गोंड गोवारी समाजबांधव या आंदोलनाच्या समर्थनात नागपुरात एकवटल्याने संविधान चौक,सीताबर्डी, महाराजबाग,सेंट्रल एव्हेन्यू हा अतिशय वर्दळीचा रस्ता रात्री उशिरापर्यंत रस्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती. सायंकाळ झाल्यानंतर आंदोलकांनी थेट व्हेरायटी चौक ठिय्या आंदोलनाने अडवल्याने पोलीस,प्रशासनाची तारांबळ उडाली.
संविधान चौकात दुपारपासून मोठ्या संख्येने गोंड गोवारी समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटले. अचानक आक्रमक आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर येऊन रस्ता जाम केला.आरबीआय चौक ते झिरो माईल पर्यंत आंदोलकांची गर्दी असल्याने सीताबर्डी परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. पोलिसांचा नाईलाज दिसला.