सरकार देशाचे,व्यक्तिगत होऊ शकत नाही – बळवंत वानखडे

0

 

अमरावती AMRAWATI  -प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी आंदोलन केले सनदशीर मार्गाने आंदोलन करताना काही घटना घडत असतात. काही जाणीवपूर्वक केल्या जात नसतात.मुळात चुकून झालेल्या घटनेत इतकी मोठी सजा. हे सरकार कुठेतरी दडपशाहीने काम करत आहे असा आरोप काँग्रेसचे आमदार शरद वानखेडे यांनी केला आहे.
कुणाल राऊत यांना अटक व दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.देशात किंवा राज्यात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी ते भारत सरकार असंच होऊ शकते. कोणाच्या वैयक्तिक नावाने सरकार होऊ शकत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जी घोषणा होती मोदी की गॅरंटी बरोबर मोदी सरकार, मोदी काही सरकार नाही. हे भारत सरकार आहे. मेळघाटामध्ये 24 गावांमध्ये अजून पर्यंत वीज पुरवठा झाला नाही. आणि इकडे हर घर बिजली, हर घर पाणी असे मोठ मोठे मोदी सरकारच्या नावाने बॅनर लागले आहेत. याच निषेधार्थ आज अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या बॅनरला मोदी सरकार ऐवजी भारत सरकारचे स्टिकर लावून निषेध करण्यात आला असेही आ बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केले.