15 वर्षे जुन्या बसेस यापुढे रस्त्यावर धावणार नाहीत !

0

 

अमरावती – अमरावती एसटी बस विभागाने पंधरा वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेल्या बस बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. 23 डिसेंबर पर्यंत 23 एसटी बसेस पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे आता या बसेस रस्त्यावर धावणार नाहीत. येत्या काही दिवसांमध्ये 23 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत 11 बसेस 15 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्या असल्यामुळे त्या देखील धावू शकणार नाहीत. त्यामुळे अनेक बस फेऱ्या सुद्धा कमी झाल्या असून, अमरावती विभागाने 171 नवीन बसची मागणी एसटी महामंडळाकडे केली आहे.मात्र, आतापर्यंत फक्त 20 नवीन बस अमरावती विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या बघता, त्या बस पुरेशा नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एसटी डेपो मध्ये बसची वाट पहावी लागते. तातडीने महामंडळाने आम्हाला नवीन बस द्याव्यात, अशी मागणी एसटी महामंडळ विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांच्याकडून करण्यात आली आहे.