Home Top News सिटूतर्फे मोदी सरकारच्या अंतरिम बजेटचा निषेध, केली होळी

सिटूतर्फे मोदी सरकारच्या अंतरिम बजेटचा निषेध, केली होळी

0

 

नागपूर NAGPUR  : केंन्द्र सरकारने निवडणूक पूर्व जे अंतरिम बजेट सादर केले ते पुन्हा एकदा कामगार -शेतकरी – सर्व सामान्य जनतेवर बोझा लादणारे असून कार्पोरेट क्षेत्राला करांमध्ये सुट देणारे आहे. महागाई व बेरोजगारी वाढविणारे बजेट असल्यामुळे सिटूच्या आवाहनानुसार अंगणवाडी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र व सिटू जिल्हा कमिटीतर्फे संविधान चौकात निदर्शने व बजेटची होळी करण्यात आली. कॉ. अरुण लाटकर, किसान सभेचे नेते व माकपाचे नागपूर जिल्हा सचिव यांनी केंद्र सरकारने ज्या योजना आहेत मनरेगा, एकात्मिक महिला व बाल विकास योजना, आशा व इतर योजना हयावरील खर्चात जबरदस्त कपात केली आहे. अंगणवाडी कर्मचा-यांच्या योजनेवरील जो खर्च २१,५०० करोड होता तो ३०० करोड रुपयांनी कमी केला आहे व तसेच मनरेगा योजनेवरील खर्चही कमी केला आहे.

या बजेटमध्ये केंन्द्र सरकारने खतांवरील देण्यात येणारी सबसिडी कपात करुन शेतकऱ्यांवर आघात केला आहे. अंगणवाडी सेविकांनी १६ फेब्रुवारीचा कामगारांचा औद्योगिक बंद व संयुक्त किसान मोर्चातर्फे पुकारण्यात आलेला ग्रामीण बंदचा प्रचार करुन मोदीच्या नेतृत्वातील भाजपाला पराभूत करण्याचा संदेश देण्याचे आवाहन केले.

यावेळी सिटूचे कॉ.दिलीप देशपांडे, महासचिव, अंगणवाडीच्या नेत्या कॉ.चंदा मेंढे, कॉ.शशी काळे, अध्यक्ष, नागपूर जनरल लेबर युनियन व जेसिटीयुएचे कॉ.गुरुप्रितसंह, एमएसएमआरएचे कों चंद्रशेखर मालविय यांनी संबोधित केले. निदर्शनाचे नेतृत्व कॉ. रामेश्वर चरपे, चंदा मारिया, माधुरी जामगडे, मिना पाटील, मिनाक्षी फुलझेले, प्रिति पराते, लता साठवणे, चंदा काशि, कोमल, पुर्णिमा सहारे, सविता नारनवरे, नंदेश्वर आदीनी केले.