तायवाडे म्हणतात,मराठा समाज पुन्हा आंदोलन कशासाठी? –

0

 

नागपूर – सुप्रीम कोर्टाने अट घालून दिली आहे, 50 टाक्यांची मर्यादा शिथिल करण्यात यावी. त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी ही मागणी लावून धरली आहे. 50 टक्के मर्यादा शिथिल करावे, इतर सत्ताधारी पक्षानेही आपल्या अजेंड्यात त्याचा समावेश करावा.
मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन जाहीर केल्याने आम्ही विचाराधीन आहोत. मात्र, 27 तारखेला सर्व आंदोलकांनी गुलाल उधळला, जल्लोष केला,मागण्या पूर्ण केल्यात. आनंदाचा दिवस आहे, अशी घोषणा केली. सर्व समाजात संभ्रम निर्माण केला. मग आता आंदोलन कशासाठी? असा सवाल ओबीसी नेते डॉ बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केला आहे.17 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाला सर्वेक्षणाची गरज काय? सकल कुणबी समाजाचा मेळावा काटोलला होत आहे,मी तिथं जाणार आहे. नवा पक्ष काढला यासाठी प्रकाश शेंडगे यांना शुभेच्छा, आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ देशपातळीवर आहे. यात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत.राष्ट्रीय पातळीवर पदाधिकारी असल्याने त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही असेही बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले.