
नागपूर (NAGPUR) : सहकारी क्षेत्रात भारतात आघाडीवर असलेली दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट संस्थेला दि. 10 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता संस्थेच्या रामनगर येथील “सिताराम भवन” मुख्य कार्यालयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिली तसेच त्यांच्यासोबत इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा सी निलिमा बावणे यानी मा. ना. श्री देवेंद्र फडणवीस यांचा पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार केला तसेच अमृतवकता मा श्री विवेकजी घळसासी यांचाही संस्थेच्या अध्यक्षांतर्फे साकार करण्यात आला. या प्रसगी 30 वर्षातील प्रगतीचा आढावा ही त्यांनी सांगितला
मा. मुख्यमंत्री यानी संस्थेच्या आर्थिक व्यवसायचा विकासाच्या प्रगतीबद्दल त्यांनी प्रशंसा केली व उत्तरोत्तर प्रगती होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली
याप्रसंगी सस्थेचे मुख्य सल्लागार मा श्री. किशोर बावण अध्यक्षा निलिमा बावणे, उपाध्यक्षा सारिका पेंडसे, संचालिका अनधा वैद्य मुख्य कार्यकारी अधिकारी चंदशेखर बसुले सहा मुख्य व्यवस्थापक नरेश चामादे सिनिअर मैनेजर अस्मिता बावणे व सर्व सिनिअर मैनेजर्स आणि कर्मचारी उपस्थित होते तसेच देवता लाईफ फाऊडेशनच्या उपाध्यक्षा कस्तुरी बावणे क्या देखिल या कार्यक्रमास उपस्थित होत्या