मराठी विषय सक्ती रद्द करणारा शासन निर्णय अयोग्य : डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी

0

 

आता आठवीत असणारे बिगर राज्य शिक्षण मंडळ अभ्यासक्रमांचे मराठी विषयांचे विद्यार्थी यांच्यापुरते तीन वर्षे म्हणजे पुढे त्यांचे नववी आणि दहावी होईस्तोवर मराठीचे गुण तीन वर्षांसाठी गुणपत्रिकेत दखलपात्र नसणार असे जे शालेय शिक्षण मंत्री ना दीपक केसरकर यांनी म्हटले आहे,
याचा अर्थ मराठी पुढे तीन वर्ष सक्तीची असणार नाही असाच होतो व मराठी विषय हा पुढील तीन वर्षांसाठी सक्तीचा असण्याला दिलेली ही स्थगिती आहे,
१ जून,२०२० च्या निर्णयात अशी कोणतीही तरतूद नसतांना ही सक्ती स्थगित करणाराच हा शासन निर्णय असल्याने तो अगोदर तातडीने कृपया मागे घेतला जावा अशी जी मागणी या अगोदरच्या पत्रान्वये केली आहे ती हा शासन निर्णय मागे घेतला जाईस्तोवर कायमच असेल व त्यासाठी आम्ही पाठपुरावा करीतच राहू,कारण दरवर्षी आठव्या वर्गात मुले नवीनच येणार व दर तीन वर्षांनी शासन त्याच्या पुढील तीन वर्षांसाठी ही सक्ती अगोदरच्या सरकारने केली असे सांगत स्थगितच करणार असाच याचा सुस्पष्ट अर्थ होतो असे स्पष्ट करणारे पत्र मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे प्रमुख संयोजक व राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना पुनः लिहिले असून १ जून,२०२० चा मराठी विषय सक्तीचा सरकारचा निर्णय कायम राखण्याच्या बाजूने हे सरकार असेल तर ही सक्ती रद्द करणे गरजेचे आहे व संबंधित शासन निर्णय त्यासाठी कृपया त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी या नव्याने पाठवलेल्या पत्रातही केली आहे.