
सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती
राज्यासह देश विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती
२६ ते २९ जानेवारी दरम्यान संत समागमाचे आयोजन
MAHARASHTRA महाराष्ट्राच्या ५७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नागपुरच्या सुमठाणा, हिंगणा येथील मिहान मधील विशाल मैदानांवर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा संत समागम संपन्न होत आहे.
संत समागमाच्या पहिल्या दिवशी भव्य शोभा यात्रेच आयोजन करण्यात आले होते या मध्ये महाराष्ट्राच्या अनेक शहरांतून व गावखेड्यांतून आलेल्या श्रद्धालु भक्तांनी गीत, संगीत, नृत्य व चित्ररथ इत्यादिच्या माध्यमातून आपल्या कलेचे प्रदर्शन केले. यानंतर झालेल्या सत्संग कार्यक्रमात महाराष्ट्रातील तसेच विविध राज्यातून आलेल्या भक्तगणांनी विविध गीत, कविता आणि व्याख्यानाच्या माध्यमातून समागमाचा विषय शांती – अंतर्मनाची या विषयावर आपले भाव व्यक्त केले.
विशेष म्हणजे संत समागमाला आलेल्या लाखों भाविकांची राहण्याची व्यवस्था व लंगरची व्यवस्था देखील भव्य स्वरूपात करण्यात आली आहे . पहिल्या दिवसाच्या सत्संगाच्या अंतिम टप्प्यात सतगुरू माता सुदीक्षाजी महाराजानी “जीवनात जेव्हा परमात्म्याचा बोध होतो तेव्हा आत्मा आणि परमात्म्याचे मिलन घडून येते ज्यायोगे आपसुकच एकत्व स्थापित होते त्यानंतर जीवनात मानवी गुणांचा स्वाभाविकपणे प्रवेश होतो.” हा दिव्य संदेश प्रवचनाच्या माध्यमातुन दिल.