कसा सुरू झाला झोमॅटोचा प्रवास ?

0

नागपूर NAGPUR : ऑनलाइन फूड डिलिव्हरी विश्वातील ZOMATO झोमॅटोचा जन्म नागपूरातून झाल्याची रंजक माहिती झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राकेश रंजन  RAKESH RANJAN यांनी रविवारी ‘फायर साइड चॅट’ दरम्यान दिली.

खासदार औद्योगिक महोत्सव-ऍडव्हांटेज विदर्भच्या दुसऱ्या दिवशी स्टार्टअपवर दिवसभर चर्चासत्र झाले. सुरुवात झोमॅटोचे सीईओ राकेश रंजन यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी एंजेल इन्व्हेस्टर शशिकांत चौधरी यांनी राकेश रंजन यांना बोलते केले. झोमॅटोच्या प्रवासाबाबत सांगताना राकेश रंजन म्हणाले,‘सात वर्षांपूर्वी मी झोमॅटो जॉइन केले. त्यावेळी झोमॅटो एप लाँच करणारे पहिले शहर नागपूर होते. त्याच नागपूरात आज मी संवाद साधत असल्याचा आनंद आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहक जे खाद्यपदार्थ कुठल्याही पारंपरिक हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये खाऊ शकत नाहीत, असे पदार्थ ऑर्डर करायचे. वेगळ्या प्रकारच्या, नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांचे ऑर्डर अधिक यायचे. त्यानंतरच्या टप्प्यात नियमित ग्राहक वाढलेत. ते रोजच्या नाश्त्यातील, जेवणातील पदार्थ मागवू लागलेत. त्यामध्ये प्रामुख्याने पिझ्झा, डेझर्ट यांचा समावेश होता. आता ग्राहकांना राजस्थानी तसेच इतर प्रादेशिक जेवण त्या-त्या पारंपरिक अनुभवासह हवे आहे. त्यादृष्टीने आम्ही ग्राहकांना अधिकाधिक चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करतोय. हे एक नवीन आव्हान आमच्यापुढे आहे.’ मुलाखतीदरम्यान राकेश रंजन यांनी ग्रोथ आणि प्रोफॅटिबिलिटी यातील परस्परपूरकता, ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याकडे भारतीयांचा वाढता कल तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील इतर स्पर्धक याबाबत दिलखुलास मते मांडलीत.
आव्हाने कशीही येवोत ग्राहक सर्वतोपरी
स्थानिक पातळीवर स्पर्धकांमुळे ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याकडे आमचा भर वाढला आहे. दर्जाशी तडजोड होत नाही. तसेच आव्हाने कशीही आलीत तरी आमच्यासाठी ग्राहक हाच सर्वतोपरी असल्याचे राकेश रंजन म्हणाले. कोव्हीड नंतर
क्लाउड किचन कल्चर वाढल्याचे सांगितले.

‘बांबू थिम सॉंग’चे गडकरींच्‍या हस्‍ते विमोचन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘विदर्भातील बांबू क्षेत्राचा विकास’ या विषयावरील चर्चासत्राला हजेरी लावली. त्‍यांनी यावेळी ‘बांबू थिम सॉंग’चे विमोचन केले. या चर्चेत भाव्‍या सृष्‍टी उद्योगचे सीईओ गणेश वर्मा, वर्ल्‍ड बांबू अॅम्‍बेसेडर नीलम मंजुनाथ, ग्रीन सोल्‍यूशन इंडियाचे संजय स‍िंग, कॅनबूचे सीईओ कामेश सलाम, नीरीचे डॉ. लाल सिंग, वेधाचे प्रमुख आर्किटेक्‍ट सुनील जोशी, यथार्थ अॅग्री बिझनेसचे सीईओ राहूल देशमुख, बांबूस्‍टानच्‍या सहसंस्‍थापक दिव्‍या मुनोत व बांबू इंडिया प्रा. लि. चे योगेश शिंदे यांची उपस्थिती होती.