ऍडव्‍हांटेज विदर्भ,स्‍टार्टअप’ साठी 25 सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी

0

नागपूर -खासदार औद्योगिक महोत्‍सव ऍडव्‍हांटेज विदर्भच्‍या पहिल्‍याच दिवशी विदर्भातील स्‍टार्टअपला आर्थिक मदत देण्‍याच्‍या उद्देशाने एंजल गुंतवणूकदारांशी एकुण 25 सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी करण्‍यात आली. ज्‍यात हल्‍दीराम, नुवाल्‍स, वर्ल्‍ड ट्रेड सेंटर यांच्‍या मोठ्या गुंतवणूकदारांसोबतच अमरावतीमधील काही उद्योगांनी स्‍टार्टअपला मदत करण्‍यासाठी हे करार केले आहेत. प्रत्‍येक गुंतवणूकदाराने स्‍टार्टअप्‍सला वार्षिक 25 लाख रुपये आर्थिक मदतीसोबतच मार्गदर्शन करण्‍यासाठी हे करार केले. याशिवाय, देशभरातील काही सीड फंड्सनी या भागातील स्‍टार्टअपला मदत करण्‍यासाठीदेखील करार केले.

विदर्भातील गुंतवणुकीला गती देण्यासाठी अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज परिसरात खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटनानंतर झालेल्‍या ‘उच्च शिक्षण आणि राष्ट्रप्रगती’ हा विषयावरील चर्चासत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्‍थ‍ितीत हे करार झाले. स्‍टार्टअपचे संयोजन शशीकांत चौधरी यांनी यासंदर्भात विस्‍तृत माह‍िती दिली.
या सत्रात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, व्हिएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, उरॉस ग्रुपचे संचालक अतुल पांडे, आय. आय. एम. नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री प्रामुख्याने उपस्थित होते.

नितीन गडकरी यांनी संशोधन केवळ चांगले महत्‍वाचे नसून तंत्रज्ञान, मार्केटीबिलीटी, दर्जेदार उत्‍पादनांची गरज असते. सोबतच सकारात्‍मकता, तत्‍परता, आत्‍मविश्‍वासाचीदेखील गरज असल्‍याचे सांगितले. विदर्भात उपलब्‍ध असलेल्‍या कच्‍च्‍या मालापासून आपण काय तयार करू शकतो, याचाही विचार होण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.