
नागपूर (Nagpur) दि. 20 फेब्रुवारी 2026:-
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील महावितरण कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आचार्य जांभेकर यांच्या कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी जागवली.
महावितरणच्या काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकारी अभियंता अजित जिचकार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

या प्रसंगी उपस्थितांनी आचार्य जांभेकर यांच्या पत्रकारिता, सामाजिक प्रबोधन आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. त्यांच्या कार्यामुळे मराठी पत्रकारितेला भक्कम पाया मिळाला असून समाजजागृतीचे कार्य अधिक प्रभावीपणे घडून आले, असे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजहितासाठी जबाबदारीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.














