
Guru Randhawa Injured : ‘शौंकी सरदार’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान पंजाबी गायक गुरु रंधावा जखमी झालाय.
Guru Randhawa Injured : पंजाबी गायक आणि अभिनेता गुरु रंधावा (Guru Randhawa Injured) गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्या डोक्यासह संपूर्ण शरिरावर गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. ‘शौंकी सरदार’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान, त्याला दुखापत झाली आहे. सिनेमातील अॅक्शन सीन शूट करत असताना त्याला ही दुखापत झाली आहे. गुरु रंधावाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याचे रुग्णालयातील फोटो शेअर केले आहेत. त्याचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी परमेश्वराकडे प्रार्थना देखील केली आहे. गुरु रंधावाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या डोक्याला पट्टी बांधण्यात आली आहे. याशिवाय गळ्याभोवती त्याने सर्वाइकल कॉलर देखील घातली आहे
सिनेमातील ॲक्शन स्टंट शूट करत असताना गुरु रंधावा जखमी
इस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना गुरु रंधावाने सांगितले की, हा त्याचा पहिला ॲक्शन स्टंट होता. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना त्याने लिहिले, “माझा पहिला स्टंट होता, पण मला यावेळी दुखापत झाली आहे. मी लवकर यातून सावरेल. ‘शौनकी सरदार’ चित्रपटाच्या सेटवर काम करत असताना ही दुखापत झालीये.. हा स्टंट फार अवघड होता,मात्र मी माझ्या प्रेक्षकांसाठी कठोर परिश्रम करेन.”
गुरु रंधवाच्या दुखापत झाल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील आश्चर्य व्यक्त केलंय. अभिनेत्री मृणाल ठाकूरने ‘Whattt’ कमेंट करताना एक आश्चर्यचकित झाल्याचा इमोजी शेअर केला. अनुपम खेर यांनी गुरु रंधावाला स्ट्राँग राहण्याचा सल्ला दिलाय. “तू सर्वोत्कृष्ट आहेस. लवकरच बरा होशील, अशा शुभेच्छाही अनुपम खेर यांनी दिल्या आहेत. मिका सिंगने देखील गुरूच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘शौनकी सरदार’ हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यात गुरु रंधवासोबत अभिनेत्री निम्रत अहलुवालिया देखील पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट प्रेम, निष्ठा आणि सांस्कृतिक अभिमानाबाबतची भावनिक कथा आहे. या सिनेमाची निर्मिती गुरू रंधावा ने स्वतःची प्रॉडक्शन कंपनी करत आहे. धीरज रतन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.