समीर वानखेडेंना ८ जून पर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

0

मुंबई: आर्यन खान (Aryan Khan Case) ड्रग्स प्रकरणावरुन अडचणीत आलेले एनसीबीचे तत्कालीन क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांना सोमवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यांना ८ जूनपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी देखील त्याच दिवशी होणार आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांनी व्हॉ्टअॅपवर शाहरूख खान यांच्याशी साधलेल्या संवादाची माहिती एनसीबीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना नव्हती, अशी माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. याच चॅटवरून आता वानखेडे हे अडचणीत येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त होत आहे.

 

सीबीआयने वानखेडेंच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी पार पडलेल्या सुनावणीीत न्यायालयाने त्यांना 8 जूनपर्यंत अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश सीबीआयला दिलेत. तर दुसरीकडे शाहरुख खान सोबत झालेल्या चॅटची माहिती वानखेडे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नव्हती, असा दावा एसीबीने केला होता. समीर वानखेडे यांनी ही चॅट न्यायालयात दाखल केली. त्यानंतर ती अधिकाऱ्यांना कळाली होती.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक खुलासे झाले आहेत. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याची योजना आखण्यात आली होती. या प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी हा वानखेडे यांच्या वतीने आर्यनकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा कट आखत होता, अशी माहिती तपासात आढळून आली आहे.