मुंबई– विद्यमान गृहमंत्री भ्रष्ट लोकांना मांडीवर घेऊन बसले आहेत.लाज वाटते यांचं नाव घेताना एवढे घाणेरडे हे लोक आहेत. बेईमान लोकांना मंत्रीपद देताना त्यांची प्रतिष्ठा काय आहे राजनीती आणि समाजात ? याकडे दुर्लक्ष झाले.
विरोधकांची याचिका खरिज झाली असली तरी आम्हाला परत नवीन पिटीशन घेऊन त्यांच्यासमोर जावं लागेल यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाच्या (BJP)वॉशिंग मशीनमध्ये टाकलेल्या लोकांवर ती कारवाई का होत नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
मी स्वतः गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांकडे, (CBI)सीबीआयकडे या राज्यातली दोन प्रकरणे पाठवली. 500 कोटी मनी लॉन्ड्रीग भीमा पाठक साखर सहकारी कारखाना राहुल कुल सध्याचे गृहमंत्री यांचे राईट हॅन्ड ५०० कोटी कसे बुडवले, गुंतवले -बुडवले हे सगळं पुराव्यासह देवूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही.
हे काडतूस आहेत ना,मग हे काडतूस घाला आता भ्रष्टाचारांच्या कुठे घालायचा आहे ते. तरच तुम्ही खरे (Home Minister)गृहमंत्री असे आव्हान राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.
फडतूस शब्दाचा अर्थ बिन कामाचा, (Supreme Court)सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नंपुसक म्हटले आहे. आम्ही अत्यंत सौम्य भाषेत म्हटलेलं आहे असा टोलाही लगावला. या देशामध्ये चोराला चोर म्हणाले तरी शिक्षा होते.
दुर्गा भोसले या शिवसेनेच्या सचिव म्हणून काम करणाऱ्या तरुण पदाधिकारी होत्या.काल त्यांचा मृत्यू झाला हे आमच्यासाठी दुःख द आहे. (cm)मुख्यमंत्री, एकही मंत्री तिथे जाऊन सीमा बांधवांचे प्रश्न सोडवत नाही. जे काही बोम्मई महाशय बोलतात त्याच्यावर उत्तर सरकारने द्यावे, खरेतर त्यांना या देशामध्ये फक्त एकच पक्ष ठेवायचे विरोधी पक्ष किंवा इतर पक्ष ठेवायचेच नाही असा आरोप राऊत यांनी केला