
नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर या संस्थेने गरजुला शैक्षणिक मदत करत पुन्हा एकदा जपली माणुसकी.
विजय प्रल्हाद बांबोळे मुक्काम पाहर्णी तालुका नागभिड गावचे असून ब्रम्हपुरी खरबी गावाजवळ उराडे राईस मिल मध्ये रात्री गस्तीला सिक्युरीटी काम करतात..
त्यांना पेपर वाचण्याचा छंद आहे याच काळात त्यांनी नाते आपुलकीच्या संस्थेबद्दल पेपरला बातमी वाचली. आपल्याला या संस्थेकडून काही मदत होईल का या हेतूने त्यांनी चंद्रपूर गाठले व नाते आपुलकीचे या संस्थेचे चंद्रपुरात कुठे ऑफिस आहे काय याची विचारणा करत असताना नवभारत वृत्तपत्र चे शहर प्रतिनिधी कमलेश भाऊ सातपुते यांना ते भेटले, त्यांनी माझ्याशी तात्काळ संपर्क साधला व मला त्या व्यक्तीबद्दल माहिती दिली. मी व्यस्त दिनचर्येत असतानाही कुणीतरी आपल्या संस्थेकडे मदतीच्या अपेक्षाने आलेले आहे याची जाणीव ठेवून तत्काळ त्यांची भेट घेतली.. व त्या व्यक्ती बद्दल योग्य ती चौकशी करून ,संस्था पदाधिकाऱ्यांना याची माहिती व्हावी या उद्देशाने सदर व्यक्तीचा विडिओ बनविला..
त्यांच्या चर्चेतून मला माहिती मिळाली की त्यांना दोन मुली आहेत ज्या पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहे. मुलींची शिकण्याची इच्छा व बापाची शिकविण्याची तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. रात्रीला राईसमिल मध्ये चौकीदारीचे काम व दिवसभर मिळेल ते शेतमजूरीचे काम करून संसाराचा गाडा चालवणारे अल्पभूधारक शेतकरी यावर्षी नापिकी मुळे आपल्या मुलींचा शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ होते. त्यांना मुलीच्या शिक्षणासाठी 60 हजार रुपयांची गरज होती काही रक्कम त्यांनी गोळा केली होती परंतु ती पुरेशी नव्हती त्यामुळे त्यांनी संस्थेकडे मदतीची अपेक्षा केली व संस्थेने कुठलाही वेळ न घालवता अगदी आपली मदत योग्य हातात जात आहे याची चौकशी करून मदतीचा धनादेश दिला..
यांना तात्काळ मदत व्हावी म्हणून संस्थेच्या कार्यकारणीत चर्चा करून निर्णय घेऊन संस्थे तर्फे 10 हजाराचा चेक मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात आला. मदतीचा धनादेश देताना संस्थेचे सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, उपाध्यक्ष किसन नागरकर व संस्थेचे सदस्य प्रा राजेश बारसागडे उपस्थित होते.
मित्रांनो नाते आपुलकीचे संस्थेचे आम्हीं फक्त माध्यम आहोत पण प्रामाणिक पणाने जर ही मदत होत आहे त्यासाठी प्रत्येक सदस्याने दायित्व , निस्वार्थ भावनेतून केलेल्या रकमे मुळेच होत आहे.