कौटुंबिक कलहाचा धक्कादायक अंत
आंजी. आधुनेकतेची बाधा झालेल्या या काळात अवघे विश्व जवळ आले आहे. जगाच्या कोणत्याही टोकावर राहणारा व्यक्तीही सहज संपर्कात असतो. ऐवढेच कशाला. वेगवेगळ्या टोकावरील मंडळी एकाचवेळी सर्वांच्या संपर्कात असतात. त्याचवेळी जवळची मानसे दुरावत आहेत. कौटुंबिक कलहाच्या धक्कादयक घटना समोर येत आहेत. अशीच समजमन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील (Wardha district ) आंजी (Anji) (मोठी) येथे उघडकीस आली आहे. पतीने दगडाने ठेचून पत्नीची हत्या केली. त्यानंर स्वतःही विषाचा घोट घेत प्राण त्यागले (The husband killed his wife by crushing her with a stone. After that he also died by taking poison). ही घटना उघडकीस आल्यानंतर आंजीत खळबळ उडाली आहे. घटनेमागील नेमके कारण अस्पष्ट असले तरी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा कयास लावला जात आहे. खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
कुंदन ज्ञानेश्वर कांबळे (४५) व शीतल कुंदन कांबळे (४०) (रा. धुळवा) अशी मृतांची नावे आहेत. कांबळे दाम्पत्य काही वर्षांपासून आंजी (मोठी) येथे वॉर्ड क्रमांक ४ मध्ये भाड्याने राहत होते. दिवसभर त्यांनी घराचे दार उघडले नाही. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली. प्रारंभी त्यांनी आवाज देऊन बघीतला. पण, प्रतिसाद मिळत नव्हता. कुंदन यांचा भाऊ संजयसुद्धा आंजीतच राहतो. शेजाऱ्यांनी भावाला माहिती देऊन बोलावून घेतले. भावाने लगबगीने घर गाठले. बाहेरून दार वाजवित दोघांनाही आवाज दिला. पण, आत कोणतीच हालचाल नव्हती. यामुळे शंका उपस्थित करणे सुरू झाले. जवळच्या पोलिस चौकीला कळविण्यात आले. पोलिसही तातडीने पोहोचले. सळाखीच्या सहाय्याने घराचे दार उघडण्यात आले. तेव्हा घरातील बेडरूमध्ये दोघांचेही मृतदेह आढळले. यावेळी कुंदनचा मृतदेह दिवाणवर झोपलेल्या अवस्थेत तर शीतलचा मृतदेह जमिनीवरील गादीवर आढळला. तिच्या डोक्यातून रक्त निघाल्याचे दिसले. तसेच बाजूला रक्ताने माखलेला एक दगडही मिळाला. यासोबतच त्या खोलीमध्ये मोबाइलचे बिल आणि सीडीआरची प्रत दिसून आली. यावरून पोलिसांनी पती-पत्नीच्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला आहे. परिसरातही तीच चर्चा आहे.