“माझ्या बापाचा नाद करायचा नाही..”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

0

मुंबई- राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आज अतिशय आक्रमक भाषण करीत अजित पवारांना थेट इशाराच दिला. “माझ्या बापाचा व आईचा नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला. माझ्याबद्दल बोला. पण माझ्या बापाचा नाद करायचा नाही. मी महिला आहे. कुणी बोलले तर टचकण डोळ्यात पाणी येते. पण, संघर्षाची वेळ आली की, हीच महिला पदर खोचून मैदानात उभी राहते. तीच अहिल्या होते व जिजाऊही होते,” या शब्दात त्यांनी अजित पवार गटाला इशारा दिलाय.
“काही जण पक्षातील वडीलधाऱ्यांना सांगतात की, तुमचे वय झाले. आता थांबा. अरे यांच्या पेक्षा आम्ही मुली बऱ्या..”, असेही त्या म्हणाल्या. “काही जण पक्षातील ज्येष्ठांना घरी बसण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे माझे मन अधिक घट्ट झाले आहे. वय केवळ आकडा असतो. आपल्यात जिद्द असली पाहिजे,” असेही त्या म्हणाल्या.