पक्ष आणि निवडणूक चिन्ह जाऊ देणार नाही-शरद पवार

0

 

मुंबई: पक्षातील अनेकांनी आज वेगळी भूमिका गेतली असताना त्याबद्दल माझे काही मत नाही. पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिले, त्यांना विश्वासात न घेताच वेगळी भूमिका घेतली गेली. पण, आता काही केले तरी पक्ष आणि चिन्ह जाणार नाही. ते जाऊ दिले जाणार नसल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वायबी चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित पदाधिकारी, आमदार व कार्यकर्त्यांच्या बैठकीपुढे बोलताना व्यक्त केला. जे लोक माझा फोटो वापरतात, त्यांना माहिती आहे की त्यांचे नाणे चालणार नाही, असा टोलाही त्यांनी बंडखोरांना लगावला.
मला पांडुरंग म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष केले, असेही सांगायचे, हा कार्यक्रम काहींनी सुरु केला असल्याचे पवार म्हणाले. पवार साहेबांचे बोट धरून मी राजकारणात आलो, असे पंतप्रधान म्हणाले होते. त्यानंतर मोदी यांनी राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हटले होते. मग, दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कशी शपथ दिली असा सवालही त्यांनी केला. विरोधकांना एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधान अस्वस्थ झाल्याचेही पवार म्हणाले.
शिवसेना-भाजपच्या हिंदुत्वात फरक
पवार म्हणाले की, आम्ही शिवसेनेसोबत गेलो तर भाजपसोबत गेलो तर वाईट काय? असा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी शिवसेनेची भूमिका समजून घेतली पाहिजे. या दोन्ही पक्षात फरक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे सर्वांना घेऊन जाणारे. पण भाजपचे हिंदुत्व मनुवादी, विषारी आणि विभाजन करणारे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.