बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास कोण असणार उमेदवार?

0

 

रत्नागिरी(Ratnagiri)महायुतीचे जागावाटप झाल्यानंतर, ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यावर सुनेत्रा पवार याच आमच्या महायुतीच्या उमेदवार असतील असे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
महायुती जागावाटप संदर्भात दिल्लीतील बैठक अत्यंत समन्वय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत या निर्धारातून ही चर्चा झाली.80 ते 85 टक्के जागावाटप पूर्ण झाले आहे. दोन दिवसांत पुन्हा एक बैठक होईल.

मित्रपक्ष आणि आमच्यात कुठेही वेगळी भूमिका नाही.मित्रपक्षांना विश्वासात घेतच चर्चा सुरू आहे. जागांबाबत छगन भुजबळ यांनी पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीबाबत जे काही पसरवले जात आहे त्यामध्ये तथ्य नाही.सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर होणे ही औपचारिकता होती. या जागेवर निवडणूक लढवावी असे आमच्या राष्ट्रवादीच्या सर्वांचं म्हणणे आहे.- ज्यावेळी राज ठाकरे साहेबांनी मनसे काढली, त्यावेळी कोणी असं म्हटले असते ठाकरे परिवार एक आहे, तर कदाचित त्यांना वेगळे वाटले असते.आता आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाचीच वाटचाल आम्ही करत आहोत असे सांगितले.