कितीही कारवाया केल्या तरी आम्ही झुकणार नाही 

0

 

 

मुंबई(Mumbai) युवा नेते आ रोहित पवार (Youth leader Rohit Pawar)यांच्यावर सातत्याने तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. त्यांचा छळ केला जात आहे, त्यांच्या कुटुंबीयांचा छळ केला जात आहे. त्यांना वारंवार तपासासाठी बोलावलं जात आहे, असा काय गुन्हा केला आहे? लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत , कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मुघलशाही पुढे न झुकण्याची. भूमिका त्यांनी घेतली आहे आणि आम्हीही घेतली आहे असे शिवसेना नेते खा संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut)यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे, महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतर सगळे लोक गप्प बसले असतील. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, फडणवीस असतील. प उद्धव ठाकरे, शरद पवार, रोहित पवार असे अनेक लोक आज आहेत.आम्ही तुमच्यापुढे गुडघे टेकणार नाही.फडणवीस यांनी थेट सांगावं रोहित पवार भाजपमध्ये या आम्ही कारवाया थांबवतो.मात्र, रोहित पवार हे कुठे जाणार नाहीत. ते आजोबांबरोबर ठाम राहतील जसे आम्ही आहोत. रोहित पवार यांच्यावर जी कारवाई सुरू आहे अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर देखील झाली.त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपमध्ये पळून गेले. प्रफुल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली, काही पुरावे ईडीने दाखवले ते भाजपमध्ये गेले.लगेच कारवाई देखील थांबली. हसन मुश्रीफांचे काय झालं? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाई थांबली.

आमच्यासारखे स्वाभिमानी लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे महाराष्ट्र तोडण्याची, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली असे म्हणत आहेत तुमचे कोण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागत आहेत. डुप्लिकेट शिवसेनेचे नशीब हेच आहे. शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आम्ही 23 जागा सतत लढत होतो आणि 23 जागा लढू. पण जे डुप्लिकेट आहेत त्यांच्या वाटेला पाच जागा येत नाहीत असा टोमणा लगावला.