
कोनसरी:-
कोनसरी गावातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी सुसंवाद साधण्याच्या एका अभिनव उपक्रमांतर्गत, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) ने कोनसरी येथील लॉयड्स कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्रात त्यांच्यासाठी १० दिवसांची प्रेरणादायी कार्यशाळा आयोजित केली आहे. LMEL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन ह्यांच्या संकल्पनेतून आयोजित सदर कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी झाले.
सदर बहुसत्रीय कार्यशाळेत प्रसिद्ध कॉर्पोरेट प्रशिक्षक श्री. गोपी गिलबिले आणि श्रीमती अनिता गिलबिले यांनी सहभागींना मार्गदर्शन केले.
उद्घाटन सत्रात उपस्थितांना संबोधित करताना LMEL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की कर्मचारी आणि त्यांच्या पती-पत्नीना कार्य आणि जीवनातील संतुलन राखण्यासाठी प्रेरित करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यांनी उपस्थितांना संवादात्मक सत्रांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यास सांगितले. कोनसरी येथील लोकांसाठी LMEL ने घेतलेल्या पुढाकारांवर भाष्य करताना, त्यांनी जमीन संपादनासाठी देण्यात येणाऱ्या भरपाईचा, दिलेल्या रोजगाराचा संदर्भ दिला. लोकांना त्यांच्या कुटुंबांसाठी चांगले जीवन सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही त्यांनी केले. लोकांनी कंपनीने आयोजित केलेल्या कार्यशाळेचा पुरेपूर फायदा घ्यावा तसेच घरात, समाजात आणि कामाच्या ठिकाणी चांगले संबंध राखावे आणि पैशाचा सुज्ञपणे वापर करावा असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.
गिलबिले दाम्पत्याने मनोरंजक सत्रांद्वारे सहभागींना चांगले आणि स्थिर जीवन जगण्याशी संबंधित विविध पैलूंबाबत प्रबोधन केले. विवाह, निरोगी पती-पत्नी संबंध, काम आणि जीवनातील संतुलन, प्राधान्यक्रम योग्यरित्या निश्चित करणे, मुलांची चांगली काळजी घेणे, प्रभावी आर्थिक नियोजन आणि बचत, मुलांचे शिक्षण, चांगले आरोग्य आणि स्वच्छता राखणे, सकस आहार, व्यसनमुक्ती, विश्वास निर्माण करणे, कामाच्या ठिकाणी नियमिततेचे महत्त्व, कार्यकुशलता, औद्योगिक सुरक्षा आदींबद्दल उत्तम मार्गदर्शन केले. उपस्थितांनी अभ्यासपूर्ण सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
पुढील काही दिवसांत एलएमईएलने कोनसरी गावातील एलएमईएल कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुकड्यांसाठी आणि त्यांच्या जोडीदारांसाठी अशीच सत्रे आयोजित करण्याची योजना आखली आहे.