राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पीक विमा योजनेबाबत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Manikrao Kokate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पीक विमा योजनेबाबत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावर्षीपासून राज्यात जूनी पीक विमा योजना होणार लागू होणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 2 टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे.
पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारे चुकीचे प्रकार होऊ नयेत म्हणून बदल
पीक विमा योजनेवरुन सातत्यानं आरोप प्रत्यारोप देखील होत होते. शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मदत मिळत नसल्याची ओरड केली जात होती. अशातच कृषीमंत्री कोकाटे यांनी जुनी पिक विमा योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्ता शेतकऱ्यांना 2 टक्के हप्ता भरकावा लागणार आहे. यामुळं गैरप्रकाराला आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे. पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारे चुकीचे प्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही बदल केलीची माहिती कोकाटे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 53 वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला देखील कोकाटे यांनी दिला आहे. पीक विम्याबाबत बैठक घेवून प्रश्न सोडवणार असल्याचेही ते म्हणाले. यंदा मे मध्येच पाऊस होतोय. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी धोरण तयार करणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले.
धोरण ठरवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार
यावर्षी कधी नव्हे ते मे मध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतोय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय धोरणात्मक आहे. तो ते धोरण ठरवून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. महत्त्वाचं म्हणजे पिक विमा योजनेमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने यावर्षीपासून शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी परभणीत दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता आयएमडी आणि कृषी विभागाच्या सल्ल्याची वाट पहावी अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी परभणी दिली आहे.