ज्येष्ठांतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0

नागपूर (Nagpur), 29 मे
ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भने सामाजिक बांधिलकी जपत संलग्न मंडळाच्या सभासदांच्‍या दहावी व बारावीच्‍या परीक्षेत गुणवत्‍ता प्राप्‍त करणा-या पाल्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
मंगळवारी ज्येष्ठ विरंगुळा केंद्र हनुमाननगर येथे झालेल्‍या या कार्यक्रमाला नागपूर महानगरपालिकेचे हनुमान नगर झोन सहायक आयुक्‍त परितोष कंकाल, साऊथ पब्लिक स्‍कूलचे संचालक देवेन दस्‍तुरे, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्‍यक्ष प्रा. प्रभुजी देशपांडे, सचिव अॅड. अविनाश तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृष्णा चौधरी, सिद्धी मानस्कर, शिप्रा पिंपळखुटे, अथर्व जोशी, आदिनाथ शास्त्री, अनदत्त पनके, सई पेटकर, मैथिली अभ्यंकर, खुशबू मांढळकर, नारायणी सिंघम, कल्याणी बोबडे, जान्हवी येरपूडे, दुर्गेश राऊत श्रेया तपास, सखी शास्त्री, काव्य पाखमोडे, राही इनकाने, श्रेयस मानसकर, रुद्विज पुंड, देवयानी ठोंबरे, प्रज्वल तांदुळकर या गुणवंतांचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. तसेच, नितीनजी गडकरी, अशोक भुताड, विजय नेरकर, अशोक बांदाणे, सुधीर वाराणशिवार, डॉ. पुष्पा तायडे यांचे वाढदिवस साजरे करण्‍यात आले.

सूत्रसंचालन मंजुषा सदावर्ती यांनी केले तर आभार डॉ. अरविंद शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्‍या यशस्वीतेसाठी विनोद व्यवहारे, प्रकाश मिरकुटे, सुभाष किन्हीकर, श्रीकांत अलोणी, उल्हास शिंदे, हेमंत शिंगोडे, शंकर चौधरी, सुधीर पौनीकर, राजाभाऊ अंबारे आणि रामदासजी ठवकर यांचे सहकार्य लाभले.