न बोललेलंच बरं – बाबा सिद्दीकी का असे म्हणतात ?

0

 

मुंबई- मी इतके वर्ष या परिवारात राहिलोय. या परिवारात होणाऱ्या घडामोडी विरोधात मी इतके वर्ष बोललो. आता राजीनामा दिलेला आहे. कारण न बोललेलं बरं असे काँग्रेसचा राजीनामा देणारे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांनी स्पष्ट केले आहे.
मी जिथे जाईन तिथे पक्षासोबत पत्रपरिषद घेईल.10 तारखेला एक सभा होईल माझ्या बरोबर असणारे लोक त्यात येतील. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कौतुक करण्यासारखेच आहेत. अजित पवार आपल्या सर्व लोकांकडे लक्ष ठेवतात हे त्यांचं मोठेपण आहे. आगे आगे देखो होता है क्या..! असे म्हणत त्यांनी आपली भविष्याची दिशा काय असणार त्याचे संकेत दिले.माझा संबंध राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खर्गे यांच्यासोबत अनेक वर्ष राहिलाय. मला पक्ष सोडताना कोणी कॉल केला हे सांगणं उचित नाही. मात्र,मी हा निर्णय अचानक घेतलेला नाही, याबाबत मी वरिष्ठांना पंधरा-वीस दिवसांपूर्वीच कळवले आहे. माझी देखील मजबुरी आहे त्यामुळे हा निर्णय घेतलाय. दुःख तर होतंय पण ते शोधा कोणामुळे ? असा सवाल केला. दरम्यान,झिशन त्याचा निर्णय तो स्वतः घेईल. काही नोटीसा वगेरे मला नाहीत असा दावा बाबा सिद्दीकी यांनी केला.