तो देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा-राज ठाकरे

0

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात झालेल्या मृत्यूंपायी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला आता राज ठाकरे यांनी (Raj Thackeray Reply to Uddhav) उत्तर दिले. कोरोनाच्या काळातही हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी आजही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असा पलटवार राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन सुरु असलेल्या वादात आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा आमनेसामने आले आहेत.
या सोहळ्यात उष्माघातामुळे आत्तापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन सध्या मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरु आहे. या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. समिती वगैरे स्थापन करण्याच्या भानगडीत न पडता सरळ कार्यक्रमाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उत्तर दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला. राज ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या काळातही अनेकप्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी आजही सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करता येऊ शकतो, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे या वादात दोन्ही ठाकरे एकमेकांच्या विरोधात सरसावले आहेत.
संजय राऊतांची उडी
दरम्यान, या वादात ठाकर गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली. भारतीय जनता पक्षाने काही पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू द्या, असा पलटवार त्यांनी केला.