Home Artical Blog जनआक्रोशच्‍या रस्‍ते सुरक्षा मोहिम उपक्रमांनी गाठला 700 चा टप्‍पा

जनआक्रोशच्‍या रस्‍ते सुरक्षा मोहिम उपक्रमांनी गाठला 700 चा टप्‍पा

0

‘सर्वसामान्यांसाठी रस्ते सुरक्षा शिक्षण’ उपक्रम 20 मे रोजी

नागपूर(Nagpur), दि. 19 मे :
सर्वसामान्य नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जनआक्रोश संस्थेच्या वतीने सुरू करण्‍यात आलेल्‍या रस्‍ते सुरक्षा मोहिमेने आतापर्यंत 700 ठिकाणी जनजागृती उपक्रम राबवले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्‍या या मोहिमेचा 700 वा उपक्रम बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत मंगलमूर्ती चौक, त्रिमूर्ती नगर, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
2012 सालापासून रस्‍ते सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्‍या जनआक्रोशचा या उपक्रमांमागचा मुख्‍य उद्देश रस्ते सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढविणे, वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देणे तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे हा आहे.
जनआक्रोश संस्था शहरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये, रस्‍त्‍यांवरील चौक तसेच, विविध राज्यांमध्ये सामाजिक जनजागृती आणि लोकहिताचे उपक्रम राबवत असते. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Road Accidents in Assam Increase by 45%, Fatalities Drop by 25%