कर्नाटक सरकार हाय हाय.. ईडी सरकारचा धिक्कार असो… अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांचा गजर

0

विधिमंडळ  अधिवेशनाच्या  पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे, महाराष्ट्र द्रोहाला संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षाचे, महाआघा़डीचे सर्व आमदार आंदोलनात सहभागी झाले.

५० खोके एकदम ओके असे बॅनर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कर्नाटक सरकार हाय हाय, ईडी सरकार हायहाय अजित पवार, दीिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, अशोक चव्हाण राजेश टोपे, एकनाथ खडसे, अंबादास दानवे, नाना पटोले यांसह इतर आमदार उपस्थित होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा