विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आज मोर्चा

0

नागपूर: विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर 19 डिसेंबर 2022, सोमवारला, दुपारी 1 वाजता *”हल्लाबोल आंदोलन”* केले जाणार आहे. हल्लाबोल आंदोलनाची सुरवात यशवंत स्टेडियम पासून(Vidarbha Rajya Andolan Samiti Morcha Today) होणार असून आंदोलनात विदर्भाचे नेते ऍड. वामनराव चटप, देशोन्नती चे मुख्यसंपादक प्रकाशभाऊ पोहरे, रंजनाताई मामर्डे प्रामुख्याने राहणार आहे. आंदोलना दरम्यान केंद्र सरकारने विदर्भाचे राज्य तात्काळ निर्माण करावे, अन्नधान्न्यावरील GST तात्काळ मागे घ्यावी, राज्य सरकारने जुल्मी वीज दर रद्द करावे, विदर्भातील 11 ही जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. बल्लारपूर, सूरजगढ रेल्वेमार्ग केंद्र सरकारने तात्काळ मंजुरसह आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून द्यावा, विदर्भातील गावरान जमिनीवरचे शेतकऱ्यांचे व रहिवासीयांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, विदर्भ वैधानिक मंडळ नको विदर्भ राज्यच हवे अशी मागणी करण्यात येणार आहे.